October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

वाहतूक समस्या न सुटल्यास रस्त्यावर उतरणार

वाहतूक समस्या न सुटल्यास रस्त्यावर उतरणार

मनसेची वाहतूक विभागाला चेतावणी

कल्याण
कल्याण शहरात दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत विविध चौक व मुख्य रस्त्यांवर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होते आहे. नागरिकांचे जीवन धोक्यात येत असूनही वाहतूक विभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे

समस्या सुटली नाही, तर रस्त्यावर उतरणार!

मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतीच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये सहजानंद चौक, रामदेव हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आधारवाडी, शहाड, अंबिका नगर अशा प्रमुख ठिकाणांवरील वाहतूक अडचणी, अपघातांची शक्यता, अनधिकृत पार्किंग, ट्रॅव्हल्स व अवजड वाहनांची गर्दी अशा विविध मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

प्रमुख मागण्या:

सहजानंद चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ठोस योजना
अवजड वाहनांवर दिवसभर बंदी
मुख्य चौकांतील अनधिकृत पार्किंगवर कारवाई
रॅपिडो, ओला, उबेरसारख्या सेवांवर योग्य नियंत्रण
केमिकल ट्रकचे मुख्य रस्त्यावर थांबणे थांबवणे
शाळा-हॉस्पिटल परिसरातील पार्किंगवर दंड न करता समज

या वेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष विनोद केने, तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.