वेस्ट झोन चैम्पियनशिपवर दणदणीत मुहर
विरार
विरार येथील नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मैदानावर पार पडलेल्या पीडी वेस्ट झोन चैम्पियनशिप २०२५ स्पर्धेत मुंबई संघाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सर्व प्रतिस्पर्ध्यांना नमवित अजिंक्य विजेतेपद पटकावले. रविंद्र संते यांच्या नेतृत्वाखाली खेळत मुंबईने संपूर्ण स्पर्धा एकतर्फी केली आणि आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले.
या स्पर्धेत मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, बडोदा आणि सौराष्ट्र असे पाच संघ सहभागी होते. अंतिम सामना मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात खेळला गेला.
नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम फलंदाजी निवडली व निर्धारित २० षटकांत १२८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात मुंबईकडून दमदार सुरुवात करण्यात आली. फक्त २ गडी बाद होत १५ षटकांत मुंबईने लक्ष्य सहज गाठून सामना जिंकला.
अंतिम सामन्यात सलामीवीर प्रसाद चौहान याने सुरेख फलंदाजी करत नाबाद ८४ धावा ठोकत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यालाच ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.
🏅 वैयक्तिक कामगिरी पुरस्कार
उत्कृष्ट फलंदाज आकाश सानप २२६ धावा
उत्कृष्ट गोलंदाज गणेश पिसाळ ७ बळी
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट आकाश पाटील ११५ धावा + ७ बळी
मुंबई संघाच्या सर्वांगीण प्रदर्शनाने वेस्ट झोन क्रिकेट क्षेत्रात पुन्हा एकदा मुंबईची ‘चॅम्पियन’ ओळख अधोरेखित केली.













Leave a Reply