कल्याण
पश्चिमेतील नूतन विद्यालयात भव्य पतंग साकारत “कोरोना गो बॅक” चा संदेश दिला.
सन १९२७ मध्ये सायमन कमिशन गो बॅकच्या आकाशात पतंग उडवुन स्वातंत्र्य सैनिकांनी घोषणा दिल्या होत्या. तेंव्हापासुन आजतागायत पतंग उडविण्याची प्रथा सुरू झाली. कल्याणमधील नूतन विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थ्यांनी १२ फूट बाय १८ फूट आकाराचा कल्याणमधील सर्वात मोठा पतंग तयार करून शाळेच्या इमारतीवर लावला आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक ही कलाकृती पाहुन कौतुक करीत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद आणि संस्थेच्या पदाधिकार्यांनी कला शिक्षक श्रीहरी पवळे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास