कल्याण
महिलांच्या सन्मानाला केंद्रस्थानी ठेवत सागर मित्र मंडळाने कल्याण पूर्वेत साडी वितरण व हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन केले. शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात झालेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या सोहळ्यास समाजसेविका सारीका महेश गायकवाड यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
परिसरातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होत पारंपरिक हळदी-कुंकू, साडी वाटप आणि संवाद कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांमधील स्नेह, ऐक्य आणि परंपरा जपण्याचा सुंदर संगम येथे पाहायला मिळाला.
समाजसेवक सागर पावशे म्हणाले,
“कल्याण पूर्वेतील सामाजिक उपक्रमांना माझे मार्गदर्शन आणि सहकार्य यापुढेही कायम राहील. महिलांना सशक्त करणे आणि त्यांच्या सार्वजनिक सहभागाला चालना देणे हेच आपल्या कार्याचे मूळ ध्येय आहे.”

या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन समाजसेवक सागर पावशे आणि समाजसेविका श्वेता सागर पावशे यांनी अत्यंत तन्मयतेने केले.
आनंद, आपुलकी आणि सांस्कृतिक उत्साहाने महिलांनी हळदी-कुंकू व साडी वितरण सोहळ्याचा मनापासून आनंद घेतला. परंपरा, स्नेह आणि सामाजिक ऐक्य अधिक घट्ट करणारा हा उपक्रम यशस्वी केला.













Leave a Reply