April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

वीटभट्टीवरील कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप

टीम परिवर्तनची सामाजिक बांधिलकी

कल्याण

समाजातील वंचित आणि गरजु, दुर्लक्षित घटकांपर्यंत त्यांना आवश्यक अशा गोष्टी टीम परिवर्तन वेळोवेळी पुरवत असते असाच एक प्रयत्न वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करून टीम परिवर्तनने पुन्हा एकदा केला आहे.

टीम परिवर्तनच्या माध्यमाने कुंदा, टिटवाळा परिसरातील वीटभट्टीवरील कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. ब्लॅंकेट वाटपासाठी डॉ. निकिता विचारे, डेल्फिना गुरवा, नेहा वाघ, श्रेया सेन, सुरज चौरसिया, दिवाकर पवार, निपा देसाई, शोभा मेनन, रामचंद्र कोकरे, रामचंद्र वारंग यांनी सहकार्य केले.

यावेळीं टीम परिवर्तनचे शोभा बोडके, तुषार वारंग, नामदेव येडगे, मंगेश तिवारी, भुषण राजेशिर्के, अविनाश पाटील उपस्थित होते. टीम परिवर्तनच्या माध्यमाने वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने लवकरच आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तुषार वारंग यांनी दिली.

,