April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

आरएसपी कमांडर मनिलाल शिंपी “जीवन गौरव २०२१” पुरस्काराने सन्मानित

 

केंद्रीय मानव एकाधिकार संघटनतर्फे नागपूर येथे पुरस्कार प्रदान

कल्याण : आरएसपी कल्याण, ठाणे यूनिटचे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांना नुकताच महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भारत ओडिसा भुवनेश्वर युनिव्हर्सिटी यांनी महाराष्ट्राचे राजदुत म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचा राजभवन येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाची दखल घेऊन केंद्रीय मानव अधिकार संघटन, नवी दिल्ली यांच्यावतीने मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून नागपूर येथे “जीवन गौरव २०२१” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नागपूर न्या. अभिजित देशमुख, नागपूर वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय पांडे, चित्रपट निर्माते दिपक कदम, अभिनेत्री अश्विनी चंद्रकापुरे, केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिद दहीवले यांच्या उपस्थितित मनिलाल शिंपी यांना हा पुरस्कार देण्यात आला.