April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

Good Detection : पोलिसांनी परत केले नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल

कल्याण

सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन नागरिकांचे गहाळ झालेले ४ लाख ५० हजार किमतींचे मोबाईल परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याण अंतर्गत असलेली महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचे सन २०१९, २०२०, २०२१ या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित पोलीस ठाण्यात प्रॉपटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेणेबाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिलेल्या योग्य त्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अधिन असलेल्या वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि हनुमंत ओऊळकर, पोहवा पवार, पोना गायकवाड, वाघ, वळवी, पोशि चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन सुमारे ४ लाख ५० हजार किंमतीच्या हरविलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेऊन हे मोबाईल तक्रारदारांना परत केले.