कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या १९८५ साली झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या पहील्या महिला नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या निर्मला महादेव रायभोळे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती महादेव रायभोळे, मुलगा दयानंद, दोन विवाहीत मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
निर्मला रायभोळे यांना गुरुवारी रात्री साडेनऊचा सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले. उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांची प्राण ज्योत मालवली. आर.पी.आय. चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही दुरध्वनीहून शोक व्यक्त करीत त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले. निर्मला रायभोळे यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी