December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

गणेश पोखरकर

सन २००६ साली पुणे विद्यापीठातून कला शाखेतून पदवीधर झाल्यानंतर गणेश पोखरकर यांनी सन २००७ साली मुंबईतील सेंट झेव्हीअर्स इन्स्टिट्यूटमधून मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रथम आयबीएन लोकमत या मराठी वृत्तवाहिनीतून इंटनशीप पूर्ण करून पत्रकारितेला प्रारंभ केला. यानंतर नवनगर, गांवकरी, जनादेश, प्रहार या वृत्तसंस्थामध्ये कल्याण शहरातून वार्तांकन केले. त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीमध्ये दोन वर्षे पॅनल प्रोड्युसर म्हणून काम पाहिले. पोखरकर यांना पीआर, जाहिरात, निवडणूक व्यवस्थापन, विधिमंडळ - संसदीय कामकाज आदी प्रकारच्या अनेक क्षेत्राचा अनुभव आहे.