कल्याण
सदिच्छा संस्थेच्या कल्याण येथील गिंडे मनोविकास विद्यालयाचे वाडेघर येथे नवीन वास्तूमध्ये उद्घाटन करण्यात आले. त्यासाठी उद्घाटक म्हणून दिव्यांग कल्याण विभाग आयुक्त समीर कुर्तकोटी व प्रमुख पाहुणे म्हणुन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी महापौर वैजयंती घोलप आणि कल्याणातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुरेश एकलहरे आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अशोक प्रधान यांना श्रद्धांजली अर्पण करुन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सदिच्छा संस्थेच्या सचिव स्मिता जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद कापसे यांनी संस्थेची थोडक्यात ओळख तसेच संस्थेने दिव्यंग मुलांसाठी निर्माण केलेल्या गिंडे मनोविकास विद्यालय, मधुकांता गुणवंत चॅरिटेबल ट्रस्ट व्यवसाय केंद्र आणि नळवाला फाऊंडेशन पुनर्वसन केंद्र यांची माहिती दिली.
दिव्यांग कल्याण विभाग आयुक्त समीर कुर्तकोटी यांनी दिव्यांग मुलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. केडीएमसी आयुक्त गोयल यांनी महापालिकेतर्फे संस्थेला अधिक विदयार्थी संख्या मंजूरी व व्यवसाय प्रशिक्षण केंद्रासाठी मान्यता देण्याचे आश्वासन दिले. तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली आणि संस्थेने चालवलेल्या उपक्रमांच्या संबंधी समाधान व्यक्त केले. माजी महापौर वैजयंती घोलप यांनी दिव्यांग शाळेसाठी महापालिकेतर्फे मिळत असलेल्या कर सवलत तसेच पणीपट्टी माफ करण्याची आयुक्ताना विनंती केली.
सदिच्छा संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर पालन यांनी आभार प्रदर्शन केले.













Leave a Reply