ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
कल्याण
डोंबिवलीतील क्रीडा स्वप्नाला अखेर प्रत्यक्ष आकार मिळू लागला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सुमारे ₹१८० कोटींच्या निधीतून ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या उभारणीस हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढे सरकला आहे.
या संकुलात २५ हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत, अत्याधुनिक सुविधा आणि विविध इंडोर-आऊटडोर पायाभूत सोयी उभारल्या जातील. पहिल्या टप्प्यात इंडोर क्रीडासंकुल व ऑलिंपिक दर्जाचा स्विमिंग पूल; तर दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय स्तराचे स्टेडियम उभारले जाणार आहे.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारो खेळाडूंसाठी ‘हक्काचे’ आधुनिक, सुसज्ज आणि व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होणार आहे.
क्रीडा सुविधांचा व्यापक विस्तार
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कळवा, मुंब्रा, दिवा याठिकाणी मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर क्रीडा सुविधा उभ्या राहिल्या आहेत.
खासदार क्रीडा संग्राम ही स्पर्धा थेट राष्ट्रीय स्तरावर पोहोचली.
याच धर्तीवर अंबरनाथ शूटिंग रेंज, ऑलिंपिक मानकांचा तलाव, उल्हासनगर-डोंबिवलीतील क्रीडासंकुले, कळवा-मुंब्रा-दिवातील नव्या सोयी यशस्वीपणे कार्यरत आहेत.
आता या यादीत डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा भव्य विस्तार जोडला जात आहे.
खेळाडूंच्या दशकांतील प्रतीक्षेला पूर्णविराम
डोंबिवलीच्या मध्यभागी असलेल्या या संकुलात जिल्ह्यातील खेळाडू अनेक वर्षं सरावासाठी अवलंबून आहेत.
अद्ययावत सुविधा नसल्याने खेळाडूंच्या प्रगतीला मर्यादा येत होत्या. खासदार शिंदे यांनी यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पासाठी भरीव निधी मंजूर करून विकासाला गती दिली आहे.
🔳 महत्वाची माहिती
प्रकल्पाचे निधीकरण: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
व्यवस्थापन: पूर्ण झाल्यावर कल्याण–डोंबिवली महानगरपालिका

मुख्य वैशिष्ट्ये:
२५,००० चौ.मी. बहुमजली क्रीडा इमारत
१,२५० चौ.मी. आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल
४०० चौ.मी. डायव्हिंग पूल व प्लॅटफॉर्म
१६,००० चौ.मी. तळघर पार्किंग
अत्याधुनिक इंडोर सुविधा:
- योगा, जिमनॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट्स, जुडो, स्क्वॅश, स्नुकर, शूटिंग रेंज, जिमनॅस्टिक
- आदरातिथ्य व निवास सुविधा, आधुनिक फिजिओथेरपी केंद्र
- बहुपयोगी सभागृह, भव्य बॅन्क्वेट हॉल्स
- आंतरराष्ट्रीय मानकांची आउटडोर स्टेडियम उभारणी




Rohit Sharma
Interesting piece about the sports complex in Dombivli—great to see such progress for local athletes. This kind of development reminds me how proper facilities can transform careers and communities. In Suplery we know the pain of managing multiple suppliers and stock for big projects, and our platform helps with real-time order building and a shared cart, which could streamline deliveries for venues like this. A must-use solution for organizers who want predictable delivery and wholesale pricing. For barbershops, salons, or wellness studios, Suplery offers a single dashboard and direct brand communication chat to keep everything running smoothly. If you’re coordinating a broader sports facility rollout, Suplery can help with inventory integration and starter kits for quick onboarding.