डोंबिवली
अनिल आय हॉस्पिटल, महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS), IMA डोंबिवली आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेत्र रक्षा – A Walk for Diabetes Eye Awareness’ या उपक्रमाला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या भव्य रॅलीमध्ये सुमारे १५०० नागरिकांनी सहभाग नोंदवत ‘ब्लाइंड-फ्री डोंबिवली’चा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार व प्रदेशाध्यक्ष (भाजपा) रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले की, “नियमित नेत्र तपासणी करून डोंबिवलीला ब्लाइंड-फ्री शहर बनवण्याच्या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावे.”
तसेच त्यांनी अनिल आय हॉस्पिटलच्या जनजागृती मोहिमेचे विशेष कौतुक केले.

अनिल आय हॉस्पिटलच्या संचालिका व MOS अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी सांगितले की,
“प्रत्येक डायबेटीक रुग्णाने दरवर्षी एकदा डायबेटीक रेटिनोपॅथीची तपासणी करणे अत्यावश्यक आहे; उशिरा निदान झाल्यास दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो.”
या प्रसंगी MOS तर्फे राज्यभरात ‘बाल नेत्र रक्षा अभियान’ जाहीर करण्यात आले असून, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नेत्र तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
या अवेअरनेस वॉकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, रोटरी-रोटरॅक्ट क्लब्स, ज्येष्ठ डायबेटॉलॉजिस्ट, IMA डॉक्टर, सामाजिक संस्था आणि शेकडो डोंबिवलीकर सहभागी झाले. कार्यक्रमात डॉ. विजय चिंचोले (IMA अध्यक्ष), किशोर मानकामे, डॉ. सुषिला विजयकुमार, प्रभू कापसे,. भाई पानवडीकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक लक्षवेधी ठरला.

नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, डोंबिवलीला ‘ब्लाइंड-फ्री सिटी’ बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अनिल आय हॉस्पिटलतर्फे पुढील काळातही नागरिकांच्या आरोग्य-जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.





Leave a Reply