Power by The Web Cloud Media

डोंबिवलीत भाजपमध्ये मोठा प्रवेश; पक्षाची ताकद वाढली

डोंबिवली

आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात डोंबिवलीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब आणि मा. स्थायी समिती सभापती दिपेश पुंडलिक म्हात्रे प्रमुख उपस्थित होते.

 

प्रवेश घेणाऱ्यांमध्ये –

ओमनाथ नाटेकर (शहर प्रमुख, शिवसेना UBT, डोंबिवली पूर्व)

सचिन कुर्लेकर (शाखा प्रमुख, शिवसेना UBT)

हरिश्चंद्र परडकर (शहर संघटक, शिवसेना UBT)

मिलिंद म्हात्रे (अध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना, डोंबिवली)

गणेश यादव (विभाग प्रमुख, मनसे)

समीर पाटील (शाखा अध्यक्ष, मनसे)

यांनी आपल्या अनुयायांसह भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर घातली.

प्रवेश सोहळ्यास माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, मंदार टावरे, मंदार हळबे तसेच शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची पकड डोंबिवलीत अधिक मजबूत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *