शीतल आणि ओम लोके यांचा सामाजिक उपक्रम
डोंबिवली
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शीतल लोके आणि शिवसेना विधानसभा समन्वयक ओम लोके यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी १ लाख रुपयांचा धनादेश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित होते. शेतकरी संकटात असताना त्यांच्या मदतीसाठी समाजातील विविध घटकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लोके यांनी केलेल्या या योगदानातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला आहे.












Leave a Reply