Power by The Web Cloud Media

केडीएमसी शाळेत गणित सराव पुस्तकांचे प्रकाशन व मोफत वितरण

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक ६८, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय, बारावे – कल्याण पश्चिम येथे विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांना धार देण्यासाठी गणिताच्या दोन सराव पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणिताचा अधिक सराव व्हावा आणि विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने ही पुस्तके तयार करण्यात आली आहेत.

स्टडी व्हेव्ज संस्थेने तयार केलेली ही गणित सराव पुस्तके श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आली. या पुस्तकांमध्ये एक ते शंभरपर्यंत पाढे, वर्ग, वर्गमूळ तसेच अधिक, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या गणिती क्रिया जलदगतीने सोडवण्यासाठी उपयुक्त सराव समाविष्ट आहे.

कार्यक्रमावेळी इयत्ता सहावी, सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना या पुस्तिका मोफत देण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून गणित विषयाची भीती दूर होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाच्या प्रसंगी पुस्तकांचे लेखक उमाकांत चौधरी, सर्वदा फाउंडेशनचे अध्यक्ष ईशान कुलकर्णी तसेच श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या सचिव मृदुला कुलकर्णी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *