Power by The Web Cloud Media

केडीएमसीत महायुतीची सरशी !

तीन महत्त्वाच्या समित्यांवर बिनविरोध निवड

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील महत्त्वाच्या समित्यांच्या सभापती पदांवर शिवसेना भाजपा महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्थायी समिती, शिक्षण समिती आणि महिला व बाल कल्याण समिती या तीन प्रमुख समित्यांसाठी महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

स्थायी समिती सभापतीपदी मल्लेश शिवन्ना शेट्टी, पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापतीपदी अभिजीत सुजाता सदानंद थरवळ, तर महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सभापतीपदी सारिका सतीश जाधव यांची निवड निश्चित झाली.

या तिन्ही पदांसाठी २ एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही घोषणा करण्यात आली.

या बैठकीला महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सचिव बाळासाहेब चव्हाण तसेच संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते.

नवनिर्वाचित सभापतींचे आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *