Power by The Web Cloud Media

रॉयल शाळेची सलग १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा

कल्याण

सुदर्शन एज्युकेशन ट्रस्ट, कल्याण (पूर्व) संचलित रॉयल हायस्कूल व रॉयल इंग्लिश हायस्कूल या सेमी इंग्रजी, मराठी व इंग्रजी माध्यमांनी एसएससी परीक्षा मार्च २०२६ परीक्षेत सलग १००% निकालाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल १००% लागला असून विद्यार्थ्यांनी विविध श्रेणीमध्ये यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यावर्षीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमात श्रेयस सुरेश घुगे याने ९२.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, निखिल सुभाष डहाळे याने ९२.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, कार्तिक सदाशिव सानप याने ९१.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तर मराठी माध्यमात पौर्णिमा बाळू बांगर हिने ७८.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक व आयुष महादेव म्हादये ७६.८०% गुण मिळवून द्वितीय व वृषभ दिपक पवार व दिक्षा प्रवीण शिंदे यांनी ७४.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

तसेच इंग्रजी माध्यमात श्रेया लक्ष्मण चौधरी हिने ९५% गुण मिळवून प्रथम, अर्णव अतुल पाटील याने ९४.२०% गुण मिळवून द्वितीय व स्वरा विजय मोरे हिने ९१.८०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.

सेमी इंग्रजी व मराठी माध्यमात एकूण ७८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ९०४ पेक्षा अधिक गुण मिळवणारे ०४ विद्यार्थी, विशेष प्राविण्यसह २५ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ३५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी १२ विद्यार्थी व पास क्लास ०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

इंग्रजी माध्यमात एकूण २६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे ०३ विद्यार्थी, विशेष प्राविण्यसह ०६ विद्यार्थी, प्रथम श्रेणी १३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शाळेच्या १००% निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. जे. पाटील यांनी संस्थेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करीत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *