वाहतुकीत मोठे बदल लागू
डोंबिवली
सागाव येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने डोंबिवलीत विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. कोळसेवाडी वाहतूक विभागाने सोमवारी २४ तासांसाठी काही प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळेश्वर चौक, मानपाडा रोड, सागाव परिसर आणि मंदिर परिसरातील काही मार्गांवर सर्वसामान्य वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे कार्यक्रमस्थळी सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
पिंपळेश्वर पॉईंट हॉटेलसमोरून मानपाडा रोडमार्गे सागावकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच मानपाडा रोडवरून पिंपळेश्वर चौक मार्गे शिळफाटा रोडकडे जाणाऱ्या वाहनांनाही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिळफाटा रोड, सोनारपाडा, साईबाबा सागाव आणि मानपाडा रोडमार्गे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, प्राणवायू वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
कोळसेवाडी वाहतूक विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.













Leave a Reply