Power by The Web Cloud Media

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

लोककल्प फाऊंडेशनकडून संगणक, प्रिंटर व ग्रीन बोर्डचे वाटप

डोंबिवली

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने लोककल्प फाऊंडेशनतर्फे डहाणू तालुक्यातील तलासरी येथील छत्रपती शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालयाला विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. किरण डी. ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळेला ५ संगणक संच, १ प्रिंटर आणि १० ग्रीन बोर्ड देण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाला साहाय्यक विभागीय व्यवस्थापक चंदन पारायणे, मुख्य व्यवस्थापक स्वप्नील चिखलकर, सामाजिक दायित्व निधी साहाय्यक प्रसाद मळीक, कार्यालयीन साहाय्यक सुनील लांजेकर आणि कार्यालयीन लिपिक रोशन कोळी उपस्थित होते.

शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी लोककल्प फाऊंडेशन आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे आभार मानत या साहित्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ संघ स्वयंसेवक उदय कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *