डोंबिवली
पश्चिमेतील जय हिंद कॉलनी येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २३ मधील नगरसेविका हर्षदा हृदयनाथ भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला. वह्यांचा लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.













Leave a Reply