कल्याण लोकसभा महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर-राणे यांचा राजीनामा; पत्र सोशल मीडियावर व्हायरल
डोंबिवली
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण लोकसभा महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या पत्रामुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
व्हायरल होत असलेल्या पत्रानुसार, वैशाली दरेकर-राणे यांनी २ ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून राजीनामा पाठविला आहे. पत्रात त्यांनी, “महिला जिल्हा संघटक या पदावर गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे या पदाला न्याय देता येत नसल्याने महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देत असून तो स्वीकारावा,” अशी विनंती केली आहे.
या पत्रात त्यांनी राजीनाम्याचे कारण केवळ ‘वैयक्तिक कारणे’ असे नमूद केले असून इतर कोणतेही राजकीय कारण किंवा पक्षांतर्गत मतभेदांचा उल्लेख केलेला नाही.
दरम्यान, हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या राजीनाम्याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा पुढील निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.













Leave a Reply