Power by The Web Cloud Media

गणेश विसर्जनासाठी ठिकाण शोधण्याची कसरत संपली

KDMCची ‘एका क्लिकवर’ सुविधा
प्रभागनिहाय नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांची गुगल मॅपसह माहिती उपलब्ध

कल्याण | १२ सप्टेंबर २०२६ 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील गणेश विसर्जन स्थळांची माहिती आता नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. महापालिकेने प्रभागनिहाय नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जन स्थळांची माहिती गुगल मॅपवरील लोकेशनसह ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.
यंदाचा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होत आहे. या काळात घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती विसर्जनासाठी जवळचे आणि सोयीचे ठिकाण सहज शोधता यावे, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने ही सुविधा सुरू केली आहे.
महापालिकेच्या ऑनलाइन प्रणालीवर प्रभाग, पत्ता, विसर्जन स्थळाचे नाव आणि गुगल मॅप लोकेशन

अशा स्वरूपात माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या घराजवळ किंवा गणेश मंडळाच्या परिसरातील विसर्जन स्थळाची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन करता येणार आहे.

विशेष म्हणजे, उपलब्ध लोकेशनच्या माध्यमातून संबंधित परिसरातील वाहतुकीचे चित्रही नागरिकांना समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विसर्जनासाठी कोणते ठिकाण निवडायचे आणि तेथे पोहोचण्यासाठी कोणता मार्ग सोयीचा राहील, याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केलेल्या नागरिकांनी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनाच्या वेळी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

विसर्जन स्थळांची माहिती पाहण्यासाठी :

https://mandap.singlewindowsystemkdmc.in/place/place

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *