कल्याण पूर्व (प्रतिनिधी):
कल्याण पूर्व येथील द्वारली गावचे रहिवासी श्री विठ्ठल बडे यांच्या घरी श्री गणेशाची अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने स्थापना करण्यात आली होती. सलग ११ दिवस दररोज नियमित आरती, पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात आली. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ओमकार घुगे यांनी अत्यंत आकर्षक आणि विलोभनीय असा नैसर्गिक देखावा तयार केला होता.
निसर्गाच्या कुशीत विसावलेले बाप्पा आणि पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाची सुंदर प्रतिमा या देखाव्याचे मुख्य आकर्षण ठरले. हा सुंदर देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ११ दिवसांच्या भक्तिमय सेवेनंतर बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात आणि मंगलमय वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला. बाप्पाच्या विसर्जनाने बडे कुटुंबीय आणि उपस्थितांचे डोळे भारावून गेले होते













Leave a Reply