Power by The Web Cloud Media

देशात १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा करतो सेवन

व्यसनमुक्ती या विषयावर ऑनलाईन वेबिनार

खर्डी महाविद्यालयात ‘व्यसनमुक्ती’ विषयावर मार्गदर्शन

खर्डी

जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी दळखण येथील राष्ट्रीय सेवा योजना व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्ती” या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन आज (०३, मार्च) रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमास सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनात व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते (दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अमली पदार्थ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखूच्या सेवनाच्या चक्र व्युहातून तरूण पिढीला बाहेर काढून, निकोटीन व तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे. ही या वर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.

देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा ५,५०० मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दुष्टचक्र यापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे.

यावेळी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पोस्टर, व्हीडिओव्दारे जनजागृती करून व्यसनमुक्तीचे आवाहन केले. याप्रसंगी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डीचे प्राचार्य प्रा. कळकटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अपर्णा जाधव, प्रा. प्रियांका पवार, इतर प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे ७५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रा. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले व व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाने समारोप झाला. विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *