कल्याण
कोळशेवाडी पोलीस ठाणेमार्फत पूर्वेतील चिंचपाडा येथील साकेत कॉलेज येथे बुधवारी सायबर क्राईमबाबत माहिती देऊन नवीन फौजदारी कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.
कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक मल्लिनाथ डोके आणि उमाकांत श्रीकृष्ण चौधरी यांनी कॉलेजमधील एनएसएसच्या व पदवीधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून जुलै महिन्यापासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या तीन नवीन फौजदारी कायद्याबाबत माहिती दिली. तसेच, सायबर क्राईम सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी, प्राचार्य डॉ. वसंत बराटे, एनएसएसचे संजय चौधरी आणि प्रिया निरलेकर उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.













Leave a Reply