Power by The Web Cloud Media

निमिष कुलकर्णी ‘द्विधा’तून प्रेक्षकांच्या भेटीला

कल्याण

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता निमिष कुलकर्णी आता मराठी चित्रपटसृष्टीत नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. नाटक आणि हिंदी चित्रपटातील भूमिकांनंतर निमिष आता ‘द्विधा’ या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

‘मर्डरवाले कुलकर्णी’ या गाजलेल्या नाटकानंतर आणि हिंदी चित्रपट ‘अग्नि’मधील भूमिकेनंतर निमिष आता एका संवेदनशील कथानकाच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘दिशा’मध्ये तो आदित्य ही व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रेमळ, समंजस आणि विश्वासू असलेला आदित्य कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा आधारवड असल्याचे निमिषने सांगितले.

बाप-लेकीच्या नात्यातील भावविश्व उलगडणाऱ्या या चित्रपटात आदित्यची भूमिका साकारताना अनेक भावनिक पैलू अनुभवायला मिळाल्याचे निमिषचे म्हणणे आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा ठरल्याची भावना त्याने व्यक्त केली.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश जाधव यांनी केले असून, चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, आसावरी काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड आणि मनोज कोल्हटकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *