कल्याण-डोंबिवली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते दोन्ही शहरांतील पक्ष पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी थेट संवाद साधणार असून, संघटनात्मक कामाचा आढावा घेणार आहेत.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, शनिवार २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता डोंबिवली पूर्वेतील प्रगती कॉलेज हॉल, दत्तनगर चौक येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर रविवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कल्याण येथे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांची बैठक होणार आहे. या दोन्ही बैठकांमध्ये राज ठाकरे उपस्थितांशी प्रत्यक्ष संवाद साधतील.
पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय आणि संघटनात्मक नियोजन, स्थानिक प्रश्न तसेच पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा यावर या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याचे मनसेकडून कळविण्यात आले आहे.
कल्याण आणि डोंबिवलीतील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्याबरोबरच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
ही माहिती मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.











Leave a Reply