Power by The Web Cloud Media

पलावामध्ये प्रथमच अत्याधुनिक Eye OT ची सुविधा

डोंबिवली

पलावा शहरातील नागरिकांना जागतिक दर्जाची नेत्रसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनिल आय हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया कक्ष (Eye OT) सुरू करण्यात आला. या सुविधेचे उद्घाटन मनसेचे नेते राजू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

पलावा परिसरातील हा पहिलाच अत्याधुनिक आणि सुसज्ज Eye OT असून, आता मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना तसेच इतर नेत्रविकारांवरील शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक स्तरावरच करता येणार आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी मुंबई किंवा अन्य शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

अनिल आय हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, अनुभवी नेत्रतज्ज्ञ आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षित, अचूक आणि गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्णकेंद्रित सेवा, आधुनिक उपचारपद्धती आणि परवडणाऱ्या खर्चात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे रुग्णालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी राजू पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, पलावा आणि परिसरातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले. आधुनिक आरोग्यसेवा नागरिकांच्या दारात पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी अनिल आय हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

संचालिका डॉ. अनघा अनिल हिरूर,

“पलावा आणि परिसरातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घराजवळच जागतिक दर्जाची, सुरक्षित आणि विश्वासार्ह नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. अत्याधुनिक Eye OT मुळे रुग्णांना अधिक परिणामकारक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळतील.”

या उद्घाटन समारंभाला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विविध मान्यवर, नागरिक तसेच रुग्णालयाचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *