Power by The Web Cloud Media

नगरसेविका पूजा म्हात्रे यांचा शैक्षणिक उपक्रम

डोंबिवली

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने प्रभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *