Power by The Web Cloud Media

सहा खासदारांच्या प्रवेशानंतर डोंबिवलीत बॅनरबाजी!

“एक ओव्हर, सहा विकेट” ते “मोठे मोठे गार केले गंमतमधी”

कल्याण

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कल्याण-डोंबिवली परिसरात राजकीय बॅनरबाजीला वेग आला आहे. विविध पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनर्समधील संदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

कल्याण-शीळ रस्त्यावर शिवसेना विभाग प्रमुख सुभाष पाटील आणि महिला आघाडी उपतालुकाप्रमुख दीपा पाटील यांच्या वतीने “एक ओव्हर, सहा विकेट” असा आशय असलेला बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरमधून सहा खासदारांच्या प्रवेशाचे स्वागत करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे डोंबिवली स्टेशन परिसरात शिवसेना विधानसभा समन्वयक ओम लोके यांच्या वतीने “मोठे मोठे गार केले गंमतमधी” असा मजकूर असलेला बॅनर झळकला आहे. या बॅनरचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सहा खासदारांच्या प्रवेशानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्समुळे डोंबिवली आणि कल्याण परिसरातील नागरिकांमध्येही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *