दहा प्रभागांमध्ये सभापतीपदासाठी रंगणार चुरस; भाजप, शिवसेना, शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज
कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १० प्रभाग समितींच्या सभापतीपदासाठी एकूण १८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. सभापतीपदाची निवडणूक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, त्यामुळे विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
महापालिका सचिवांकडे १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. दहा प्रभाग समित्यांमधून प्रत्येकी एका सदस्याची सभापती म्हणून निवड केली जाणार आहे.
कोणत्या प्रभागात कोणाचे अर्ज?
१/अ प्रभाग: शिवसेनेचे बंदेश नारायण जाधव.
२/ब प्रभाग:शिवसेनेच्या सुप्रिया प्रभुनाथ भोईर आणि शिवसेना (उबाठा)च्या स्वप्नाली विनोद केणे.
३/क प्रभाग:भाजपच्या मेघाली सचिन खेमा, शिवसेनेचे प्रतिक प्रकाश पेणकर आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे रमिज मनियार.
४/जे प्रभाग:शिवसेनेच्या दर्शना समिप काळे.
५/ड प्रभाग:मनसेच्या शितल महेश मंढारी.
६/फ प्रभाग:भाजपच्या मंदा सुभाष पाटील.
७/ह प्रभाग:भाजपच्या रविना राहुल म्हात्रे, मनसेचे संदेश हरिश्चंद्र पाटील आणि शिवसेनेच्या रेखा जनार्दन म्हात्रे.
८/ग प्रभाग:भाजपच्या कविता मिलिंद म्हात्रे आणि शिवसेनेचे सूरज राजन मराठे.
९/आय प्रभाग:भाजपच्या सरोज मनोज राय आणि शिवसेना (उबाठा)चे निलेश अशोक खंबायत.
१०/ई प्रभाग:भाजपच्या रविना अमर माळी आणि शिवसेनेचे अर्जुन बाबू पाटील.
अशा प्रकारे १० प्रभाग समिती सभापतीपदांसाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल करताना पक्षीय शक्तिप्रदर्शन
शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांच्यासह पदाधिकारी व महापालिका सदस्य उपस्थित होते. भाजपच्या उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच इतर पदाधिकारी आणि पालिका सदस्य उपस्थित होते.
आता २१ ऑक्टोबरच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, कोणत्या प्रभाग समितीवर कोणाचा सभापती विराजमान होणार, याची उत्सुकता वाढली आहे.












Leave a Reply