देशभरात मोबाईलवर अचानक सायरन
कल्याण
२ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास देशभरातील लाखो-कोट्यवधी मोबाईल फोनवर अचानक सायरन वाजू लागल्याने अनेक नागरिक गोंधळले आणि काही ठिकाणी भीतीचं वातावरणही निर्माण झालं. कोणताही पूर्वसूचना नसताना आलेल्या या अलर्टमुळे सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आलं.
मात्र, यामागे कोणताही धोका नसून ही एक नियोजित चाचणी असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डिजास्टर अलर्ट सिस्टीमची चाचणी घेण्यात आली.
ही अत्याधुनिक इमर्जन्सी अलर्ट सिस्टम भविष्यातील आपत्ती जसे की भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा इतर नैसर्गिक संकटांच्या वेळी नागरिकांना वेळेवर सूचना देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. संकट येण्यापूर्वीच इशारा देणं म्हणजे जीव वाचवण्याची संधी आणि याच मिशनवर ही सिस्टीम काम करणार आहे.
सरकारकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, अशा प्रकारचे अलर्ट मिळाल्यास घाबरून न जाता संदेश काळजीपूर्वक वाचावा आणि आवश्यक त्या सूचना पाळाव्यात.











Leave a Reply