NEET-UG वादाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
नवी दिल्ली
NEET-UG 2026 परीक्षेतील अनियमितता आणि त्यानंतर सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. प्रधान यांनी शनिवारी (25 जुलै) राजीनाम्याची माहिती दिली.
3 मे रोजी झालेल्या NEET-UG 2026 परीक्षेत अनियमितता समोर आल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करून प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवली होती. त्यानंतर 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. NEETच्या अधिकृत संकेतस्थळावरही 21 जूनची फेरपरीक्षा आणि त्यासंबंधीच्या सूचना नोंदवण्यात आल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या राजीनामा पत्राची प्रत
प्रधान यांनी आपल्या पत्रात गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमामुळे व्यथित असल्याचे म्हटले आहे. हा विषय वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून देशातील युवाशक्ती महत्त्वाची असल्याची भूमिका त्यांनी मांडली. देशातील परिस्थितीचा फायदा देशविरोधी शक्तींना होऊ नये, विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर पेचात अडकू नये आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रित करावे, या विचारातून पंतप्रधानांकडे राजीनामा पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
NEET-UG 2026 प्रकरण
- 3 मे : मूळ परीक्षा
- अनियमितता समोर आल्यानंतर परीक्षा रद्द
- CBIकडे चौकशी
- 21 जून : फेरपरीक्षा
- 16 जुलै : निकाल जाहीर
- 25 जुलै : धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा पाठवला











Leave a Reply