कल्याण
“आपण जेष्ठांचा आदर करतो, सन्मान करतो तेव्हा समाज संस्कारी, समृद्ध आणि टिकून राहणारा बनतो,” असे प्रतिपादन समाजसेविका कावेरी देसाई यांनी केले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पॅनल क्रमांक ५ तर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार व आरोग्य किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम बिर्ला कॉलेज विभागीय शाखा, सह्याद्री नगर येथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुढे प्रभागातील जेष्ठ नागरिकांना आरोग्य किट देऊन गौरविण्यात आले.
https://youtube.com/shorts/CJcoLg3DDM4?feature=share
या प्रसंगी जिल्हा प्रमुख अॅड. अल्पेश भोईर, समाजसेवक किशोर देसाई, जिल्हा संघटक रेखा कंटे, विधानसभा संघटक राजलक्ष्मी अंगारखे, शहर प्रमुख बाळा परब, उपशहरप्रमुख विश्वनाथ जाधव, उपजिल्हा संघटक सुनिता लेकावले, शहर संघटक मिनल कांबळे यांसह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
जेष्ठ नागरिक समाजाचे आधारस्तंभ असल्याने त्यांच्याकडून प्रत्येक पिढीला मार्गदर्शन व शिकण्यासारखे बरेच काही मिळते. “वेगवान जीवनशैलीत जेष्ठांशी संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कावेरी देसाई













Leave a Reply