कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने व्यापक व नियोजनबद्ध तयारी केली आहे. यंदा एकूण ३९२ लोकेशन्सवर १६०४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदारांच्या सोयीसाठी केंद्रांची रचना काळजीपूर्वक करण्यात आली आहे.
या १६०४ मतदान केंद्रांपैकी १०५५ केंद्रे तळमजल्यावर, ९ केंद्रे पहिल्या मजल्यावर, ४८२ केंद्रे पार्टिशन स्वरूपात तर ५८ मतदान केंद्रे मंडपात असतील. विशेष म्हणजे १६ ठिकाणी १० पेक्षा अधिक मतदान केंद्रे असणार आहेत, ज्यामुळे गर्दीचे योग्य नियोजन होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय पाहता,
निर्णय अधिकारी १ : ५५ लोकेशन्स
निर्णय अधिकारी २ : ४७ लोकेशन्स
निर्णय अधिकारी ३ : ४० लोकेशन्स
निर्णय अधिकारी ४ : २८ लोकेशन्स
निर्णय अधिकारी ५ : ४७ लोकेशन्स
निर्णय अधिकारी ६ : ४१ लोकेशन्स
निर्णय अधिकारी ७ : ४७ लोकेशन्स
निर्णय अधिकारी ८ : ४० लोकेशन्स
निर्णय अधिकारी ९ : ४७ लोकेशन्स
अशा एकूण ३९२ ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार, गर्भवती महिला यांना मतदान अधिक सुलभ व्हावे, यासाठी बहुसंख्य मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आली आहेत. गरजेनुसार रॅम्प, व्हीलचेअर यांसारख्या सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मतदारसंख्येचा विचार करता,
पुरुष मतदार : ७,४५,६६४
महिला मतदार : ६,७८,८७०
इतर मतदार : ५५२
अशी एकूण १४,२५,०८६ मतदारसंख्या असून,
लोकशाहीच्या या महापर्वासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.













Leave a Reply