कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने मतदारांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक व्हावी, या उद्देशाने ही विशेष ऑनलाईन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
या सुविधेमार्फत मतदारांना केवळ आपले नाव सर्च केल्यानंतर आपले मतदान केंद्र, मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक तसेच मतदान केंद्राचे अचूक जीपीएस लोकेशन एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मतदारांना आता व्होटर स्लिपवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
मतदारांनी मतदान क्रमांक व मतदान केंद्राची माहिती मिळवण्यासाठी..
https://kdmc.localbody.org/Home/Voter_Search
या लिंकचा किंवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या QR कोडचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
घरबसल्या मोबाईलवरून मतदान केंद्राची अचूक माहिती मिळाल्यामुळे मतदानाच्या दिवशी होणारी धावपळ टळणार असून, नागरिकांचा वेळ वाचणार आहे. ही डिजिटल सुविधा म्हणजे ‘गव्हर्नन्स, पण मेक इट स्मार्ट’ असा थेट अनुभव देणारी पायरी ठरणार आहे.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे मतदारांचा सहभाग वाढण्यास मदत होणार असून, मतदान प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













Leave a Reply