Power by The Web Cloud Media

केडीएमसी स्थायी समितीत कोण कोण ?

16 सदस्यांची यादी जाहीर

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत विविध पक्षांच्या नगरसेवकांना स्थान देण्यात आले असून त्यामध्ये शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीच्या शिव आघाडीचे 8 सदस्य, भाजपाचे 7 सदस्य आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 1 सदस्य असा समावेश आहे.

शिवसेनेचे गजानन पाटील, जयवंत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे आणि महेश गायकवाड यांचा समावेश आहे. तसेच मनसेचे गणेश लांडगे यांनाही स्थायी समितीत स्थान देण्यात आले आहे.

भाजपाकडून दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनिषा गायकवाड, मुकुंद पेडणेकर, नंदू म्हात्रे आणि उपेक्षा भोईर यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विशाल गारवे यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्थायी समिती ही महानगरपालिकेतील महत्त्वाची निर्णय प्रक्रिया करणारी समिती मानली जाते. त्यामुळे या समितीतील सदस्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *