Power by The Web Cloud Media

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

सलग ५ दिवस शाखा सेवा प्रभावित होण्याची शक्यता

मुंबई

बँक ग्राहकांसाठी सप्टेंबरच्या अखेरीस महत्त्वाची माहिती समोर आली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक कायम ठेवली आहे. २२ सप्टेंबरच्या चर्चेनंतरही संप पुढे ढकलण्यात आलेला नसल्याने या काळात बँक शाखांमधील सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. या संपाचा परिणाम सलग पाच दिवस जाणवू शकतो.

२६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्याने त्यानंतर २८, २९ आणि ३० सप्टेंबर या तीन संपाच्या दिवसांची भर पडणार आहे. केंद्र सरकारनेही या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि व्यवसायांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयीचा उल्लेख केला आहे.

संपाचा मुख्य मुद्दा

बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा कार्यआठवडा लागू करण्याची मागणी हा आहे. सरकारने बँक संघटनांशी चर्चा केली असून ही मागणी अद्याप विचाराधीन असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, UFBUने २८ ते ३० सप्टेंबरचा संप कायम ठेवला आहे.

ग्राहकांनी काय करावे?
ज्या ग्राहकांना शाखेत प्रत्यक्ष जाऊन करावयाचे महत्त्वाचे व्यवहार आहेत, त्यांनी ते २८ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. SBI आणि इतर बँकांनी ग्राहकांना आवश्यकतेनुसार ATM, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि UPI यांसारख्या पर्यायी माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

मात्र, संपामुळे सर्व बँकिंग सेवा पूर्णपणे बंद राहतील असे नाही. डिजिटल आणि स्वयंचलित सेवा उपलब्ध राहण्याची शक्यता आहे; प्रत्यक्ष शाखा कर्मचारी आवश्यक असलेल्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *