Power by The Web Cloud Media

हिजाबच्या समर्थनार्थ महीला Congress ची निदर्शने

महिलांच्या दोन गटात झाली झटापट

कल्याण

कर्नाटकात हिजाबवरुन सुरु असलेला वादंग देशभरात पसरला आहे. अनेक ठिकाणी हिजाबच्या समर्थनात आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेत्तृत्वाखाली महिला आघाडीकडून हिजाबच्या समर्थनासाठी पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने सुरु असतांना एका महिलेने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत वाद घातला. यावेळी, येथील काँग्रेस कार्यकर्त्या आणि या महिलेसोबत असलेल्या काही महिलांमध्ये झटापट झाली. महिलांचा विरेाध पाहता काँग्रेसने कसेबसे हे आंदोलन उरकले.

हिजाबसाठी राजकीय पक्ष राजकारण करीत असल्याचा आरोप या महिलांनी केला. तर, हे आंदोलन उधळून लावण्यासाठी काही महिला पाठविण्यात आल्याचा आरोप काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *