फार्म हाऊससह निर्माणाधिन चाळींची कामे केली भुईसपाट
कल्याण
कल्याणच्या ग्रामीण भागातील वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणावर आज कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून फार्म हाऊससह निर्माणाधिन चाळींची कामे यावेळी भुईसपाट करण्यात आली.
कल्याणच्या ग्रामीण भागात वन विभागाची मोठ्या प्रमाणावर जमीन असून या जमिनीवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहेत. वन विभागाच्या मालकीच्या हेदुटणे, भाल, धामटन या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करत चाळीच नव्हे तर फार्महाउस देखील उभारण्यात आले आहेत. या अतिक्रमण करणाऱ्यांना वन विभागाकडून नोटीसा धाडत संबधित जागा मालकीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, संबंधितांकडून कोणतेही पुरावे प्राप्त न झाल्याने आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणावर कारवाई करत फार्म हाउस आणि बैठ्या चाळीचे बांधकाम तोडले आहे.
या कारवाईदरम्यान वनविभागाच्या पथकाला विरोध करण्यात आला. मात्र, विरोध डावलून एसआरपीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
स्वतःची आणि प्रशासनाची फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी वनविभागाच्या जमिनीवर केलेल्या बांधकामाबाबत खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नये – रघुनाथ चन्ने (वनविभाग अधिकारी)











Leave a Reply