Power by The Web Cloud Media

लिफ्ट कोसळल्याने चार कर्मचारी जखमी

कल्याण

पश्चिमेतील अहिल्याबाई होळकर चौकातील बहुमजली इमारतीची लिफ्ट आज सायंकाळी सातच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. यात लिफ्ट दुरुस्तीचे काम करणारे चार कर्मचारी जखमी झाले आहेत.

माणिक कॉलनी ही बहुमजली इमारत आहे. या इमारतीच्या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. दुरुस्ती सुरु असताना लिफ्ट कोसळली. त्या लिफ्टमध्ये दुरुस्तीचे काम करणारे चार कर्मचारी होते. लिफ्ट कोसळल्याचा जोरदार आवाज होताच इमारतीच्या सुरक्षा रक्षकासह अन्य नागरीकांनी लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. लिफ्टमध्ये अडकलेल्या चारही कर्मचाऱ्यास तातडीने बाहेर काढण्यात आले.

जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *