Power by The Web Cloud Media

अंनिसची राज्य कार्यकारिणी जाहीर

औरंगाबाद

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षपदी अविनाश पाटील (धुळे) तर राज्य कार्याध्यक्षपदी माधव बावगे (लातूर) यांची एकमताने निवड करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक दि. ३, ४, ५ जून रोजी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे संपन्न झाली. या राज्यस्तरीय बैठकीस ३२ जिल्ह्यातून १७२ राज्य व जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२२- २०२५ या तीन वर्षासाठीची नूतन राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

सविस्तर राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

अध्यक्ष: अविनाश पाटील (धुळे)

उपाध्यक्ष: डॉ. प्रदीप पाटकर (पनवेल), उत्तम कांबळे (नाशिक), प्रा. शामरावअण्णा पाटील (इस्लामपूर ,सांगली), महादेवराव भुईभार (अकोला), डॉ. रश्मी बोरीकर (औरंगाबाद)

कार्याध्यक्ष: माधव बावगे (लातूर)

प्रधान सचिव : संजय बनसोडे (इस्लामपूर, सांगली), गजेंद्र सुरकार (वर्धा), नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई), डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक)

राज्य सरचिटणीस: 

संजय शेंडे (नागपूर), बबन कानकिरड (अकोला), विनायक सावळे (शहादा, नंदुरबार), ॲड. रंजना पगार-गवांदे (संगमनेर, अहमदनगर), शहाजी भोसले (औरंगाबाद), रूक्साना मुल्ला (लातूर), विजय परब (मुंबई), सचिन थिटे (मुंबई), सुधाकर काशीद (मोहोळ,सोलापूर), कृष्णात कोरे (कोल्हापूर).

बुवाबाजी विरुद्ध संघर्ष विभाग: कार्यवाह – ॲड. गोविंद पाटील (सोलापूर), सहकार्यवाह – विष्णू लोणारे (भंडारा), प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले (नांदेड)

विविध उपक्रम विभाग: कार्यवाह – अनिल करवीर (पालघर), सहकार्यवाह – रामदास देसाई (कोल्हापूर)

वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प: कार्यवाह – प्रा. दिगंबर कट्यारे (जळगाव), सहकार्यवाह – विलास निंबोरकर (गडचिरोली), प्रकाश कांबळे (वर्धा)

महिला सहभाग: कार्यवाह – आरती नाईक (पनवेल, रायगड), सहकार्यवाह – सारिका डेहनकर (वर्धा)

युवा सहभाग: कार्यवाह – प्रियंका खेडेकर (पनवेल,रायगड), सहकार्यवाह – रुपेश वानखेडे (यवतमाळ), अमोल चौगुले (अंबरनाथ, ठाणे)

जोडीदाराची विवेकी निवड: कार्यवाह – हर्षल जाधव ( कोल्हापूर)

जातपंचायतीला मूठमाती अभियान: कार्यवाह – कृष्णा चांदगुडे (नाशिक)

मिश्र विवाह विभाग: कार्यवाह – दिलीप आरळीकर (लातूर), सहकार्यवाह – अतुल बडवे (जालना)

प्रशिक्षण विभाग: कार्यवाह – प्रा. सुरेश बोरसे (शिरपूर, धुळे) सहकार्यवाह – सुधाकर तट (बनसारोळा, बीड)

प्रकाशन व वितरण: कार्यवाह – विशाल विमल (पुणे), सहकार्यवाह – नवल ठाकरे (धुळे)

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका संपादक मंडळ : संपादक – प्रा. डॉ. नितीन शिंदे (इस्लामपूर, सांगली), कार्यकारी संपादक – उत्तम जोगदंड (कल्याण, ठाणे),

सहसंपादक – प्रा डॉ. शामसुंदर मिरजकर (इस्लामपूर,सांगली),

सदस्य – प्रा. डॉ. मांतेश हिरेमठ (कोल्हापूर), प्रा.सुशील मेश्राम (नागपूर), डॉ.अरुण शिंदे (कोल्हापूर), बाळू दुगडूमवार (नांदेड), प्रल्हाद मिस्त्री (नाशिक)

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका सल्लागार : किशोर बेडकिहाळ (सातारा), डॉ प्रदीप पाटकर (पनवेल), संध्या नरे पवार (मुंबई)

मुखपत्र व्यवस्थापन विभाग : कार्यवाह – अजय भालकर (इस्लामपूर,सांगली) सहकार्यवाह – राजेंद्र फेगडे (नाशिक), तुकाराम शिंदे (उस्मानाबाद)

थॉट विथ ॲक्शन: कार्यवाह – हर्षदकुमार मुंगे (पुणे)

मानसिक आरोग्य व्यवस्थापन: कार्यवाह – डॉ. प्रदीप जोशी (जळगाव), सहकार्यवाह – डॉ.अनिल डोंगरे (रायगड)

विज्ञान बोध वाहिनी: कार्यवाह – भास्कर सदाकाळे (तासगाव, सांगली), सहकार्यवाह – बाबा हलकुडे (लातूर)

सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग: कार्यवाह – मनोहर जायभाये (अंबेजोगाई, बीड), सहकार्यवाह – एस. एस. शिंदे (डोंबिवली, ठाणे)

सोशल मीडिया व्यवस्थापन: कार्यवाह – किर्तीवर्धन तायडे (नंदुरबार), सहकार्यवाह – रविराज थोरात (पुणे)

निधी व्यवस्थापन विभाग: कार्यवाह – परेश शाह (शिंदखेडा, धुळे), सहकार्यवाह – सुधीर निंबाळकर (ठाणे)

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समन्वय: कार्यवाह – डॉ.सुदेश घोडेराव (नाशिक)

कायदेविषयक व्यवस्थापन विभाग: कार्यवाह – ॲड.मनीषा महाजन (पुणे), सहकार्यवाह – ॲड. तृप्ती पाटील (डोंबिवली, ठाणे)

दस्तऐवज संकलन: कार्यवाह – सुरेश बिऱ्हाडे (धुळे)

कार्यालयीन व्यवस्थापन : कार्यवाह – उत्तरेश्वर बिराजदार (लातूर)

विवेक वाहिनी : कार्यवाह – प्राचार्य, डॉ.सविता शेटे (बीड), सहकार्यवाह – प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले (परभणी)

या राज्य कार्यकारीणीमध्ये निमंत्रित म्हणून प्राचार्य अनिरुद्ध जाधव (लातूर), विजय सालंकार (नागपूर), कॉ. बाबा अरगडे (नेवासा, अहमदनगर), उल्हास ठाकूर (रायगड), प्रा. डॉ. नरेश आंबिलकर (भंडारा), सुशिला मुंडे, प्राचार्य मच्छिन्द्रनाथ मुंडे, सुरेखा भापकर (मुंबई), नितीनकुमार राऊत (रायगड), हरिदास तम्मेवार (लातूर) यांची निवड करण्यात आली आहे.

या राज्य कार्यकारिणी निवड सहमती समितीचे काम सुशीला मुंडे, नितीनकुमार राऊत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *