डोंबिवली
संत निरंकारी मिशनच्या वतीने स्वयंवर हॉल, गोग्रासवाडी, डोंबिवली (पूर्व) येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८१ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यामध्ये ७३ पुरुष तर ८ महिला रक्तदात्यांचा समावेश होता. जे. जे. महानगर रक्तपेढी, मुंबई आणि संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले, मुंबई यांनी रक्त संकलन केले.
गोग्रासवाडीसह आजूबाजूच्या सागाव, आयरे गाव, नांदिवली आदी परिसरातील निरंकारी भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने या शिबिरात भाग घेतला. संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते ईश्वराचे नामस्मरण करत फीत कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्यांमध्ये शिवसेना उपशहर प्रमुख संजय विचारे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पीठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे आदींचा समावेश होता. या मान्यवरांनी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले.
संत निरंकारी मंडळाच्या गोग्रासवाडी शाखेचे मुखी जयदेव गायकवाड यांच्यासह स्थानिक सेवादल सदस्यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.











Leave a Reply