जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भात-भाकरी करून आंदोलन
ठाणे
इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे कारण पुढे करत केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने अनोखे आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चुल्हा जलाओ” आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महिलाध्यक्षा मनिषा भगत, युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून त्यावर भात शिजवला तसेच भाकरी भाजत सरकारच्या दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
मनोज प्रधान म्हणाले की, अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले आहे. युद्धाची शक्यता आधीपासून असतानाही सरकारला योग्य नियोजन करता आले नाही. त्यामुळेच या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होणार आहे. एकीकडे महिलांना ‘लाडकी बहिण’ म्हणायचे आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधीच गॅस दरवाढीची भेट द्यायची, हे खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनिषा भगत यांनीही सरकारवर टीका करत ही दरवाढ म्हणजे सामान्य जनतेची लूट असल्याचे म्हटले. आधीच महागाई वाढलेली असताना गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करणे योग्य नाही. सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसुद खान, राजू चापले, मिलिंद बनकर, एकनाथ जाधव, संगीता लोकरे, कैलास हावळे, दीपा गावंड, शशिकला पुजारी, मल्लिका पिल्ले, मनीषा पाटील, कुणाल भोईर, सचिन पंधरे, जगत सिंग, सुमित साधवाणी, शिवा कालू सिंह, पुजा जाधव, रेश्मा भानुशाली, विशांत गायकवाड, महेश मोरे, पद्माकर पाटील, राजु पाटील, साहिल उदुगडे आदी उपस्थित होते.













Leave a Reply