Power by The Web Cloud Media

निळजेच्या अजिंक्य पगारेची ‘अग्निवीर’ म्हणून निवड

डोंबिवली

निळजे येथील सर्वोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी अजिंक्य पगारे याची भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली आहे. जिद्द, कठोर परिश्रम आणि देशसेवेची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे निळजे परिसरासह डोंबिवलीत अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजिंक्यच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सत्कार सोहळ्यात शिक्षकांनी अजिंक्यच्या शिस्तबद्ध, मेहनती आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना अजिंक्यने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन आणि विद्यालयाला दिले. देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची भावना त्याने व्यक्त केली.

अजिंक्यच्या या यशामुळे सर्वोदय विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून परिसरातील अनेक युवकांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे. भारतीय सैन्यात सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *