कल्याण
रुवा फाउंडेशन आणि बिलियन हर्ट बिटिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालाजी हौसिंग सोसायटीमध्ये पौंगंडावस्थेतील मुलींचे मासिक पाळीबदल समज-गैरसमज, लैंगिक शिक्षणाबाबत विशेष सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं.
यात सत्राच्या सुरवात अपोलो समूहाचे महाराष्ट्राचे सीएसआर प्रमुख विठ्ठल उर्फ अभय बालाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. रूवा फाउंडेशनच्या संस्थापक लेसली डिसोझा यांनी महिलांच्या सुरक्षेच्या बाबतींत आपलं मत व्यक्त केलं. विधी गोलतकर ह्यांनी स्त्री पुरुष यांच्यातील लैंगिक समानता कशी गरजेची आहे याबाबत मार्गदर्शन केलं. कस्तुरी नायडू यांनी मासिक पाळी समज गैरसमज ह्यावर विशेष भर देऊन महिला उपयोगी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला भगत यांनी केले तर बालाजी सोसायटीमधील सर्व महिलांच्यावतीने उज्वला भगत ह्यांनी आभार मानले.











Leave a Reply