Power by The Web Cloud Media

Railway मेगाब्लॉक दरम्यान केडीएमटीची विशेष बससेवा

कल्याण

शुक्रवार ते रविवार दरम्यान मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकात मेगाब्लॉक दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या (KDMT) वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बससेवेची व्यवस्था केली आहे.

विभागीय रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे, मुंबई, यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ५ व्या व ६ व्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवार, ४ फेब्रुवारी ते रविवार, ६ फेब्रुवारी या तीन दिवसात ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवासी नागरिकांना पर्यायी वाहतुक व्यवस्थेची गरज विचारात घेता, कोपर ते ठाकुर्ली या रेल्वे स्थानकादरम्यान तसेच कल्याण ते डोंबिवली (९० फुटी रस्ता या मार्गे) रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी गर्दीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाने १५ बसेसद्वारे विशेष बससेवा पुरविण्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय या कालावधीत प्रवासी गर्दीचा ओघ विचारात घेऊन आवश्यकतेनुसार कल्याण – ठाणे या रेल्वे स्थानकादरम्यान देखील केडीएमटीची बससेवा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे.

रेल्वेच्या या मेगा ब्लॉक दरम्यान केडीएमटीच्या विशेष बससेवेचा लाभ प्रवासी नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *