Power by The Web Cloud Media

Dombivali MIDC : डोंबिवलीतील १५६ कारखान्यांचे होणार स्थलांतर

पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलवणार

मुंबई

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक व अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळातील बैठकीत आज घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिल्यानंतर येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व उद्योग विभागाने केलेल्या पाहणीनुसार १५६ कारखाने रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात तसेच प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर येथील कारखाने इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये ५२५ औद्योगिक भूखंड आहेत, तर ६१७ निवासी भूखंड आहेत.

https://twitter.com/Subhash_Desai/status/1488813959360946182?t=mheGyHRUoegD9lBScpRftg&s=19

रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून ५० मीटर अंतरावर असलेले धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सध्याचे धोकादायक कारखाने उत्पादनात बदल करून व्यापारी, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान संबंधी उत्पादने तयार करण्यास परवानी दिली जाईल, असे सुभाष देसाई (उद्योगमंत्री) यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *