संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- फाल्गुन
पक्ष:- शुक्ल
तिथी:- प्रतिपदा
वार:- गुरुवार
नक्षत्र:- पूर्वाभाद्रपदा
आजची चंद्र राशी:- कुंभ/मीन
सूर्योदय:- ६:५२:५२
सूर्यास्त:- १८:४१:३४
चंद्रोदय:- ३१:२८:०४
दिवस काळ:- ११:४८:४२
रात्र काळ:- १२:१०:३७
आजचे राशिभविष्य
मेष रास:- अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे लक्ष विचलित होईल. ध्यानधारणा करा अध्यात्मिक शक्ती वाढेल.
वृषभ रास:- क्रीडा प्रकरणी मैदानावरील खेळांमध्ये सहभाग घ्याल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन रास:- मुलांच्या यशस्वी होण्यामुळे आज तुमचा अभिमान वाढेल.
कर्क रास:- संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आज आपणास हमखास यशप्राप्ती होईल.
सिंह रास:- घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल कुटुंबातील व्यक्तींना बरोबर आजचा वेळ व्यतीत होईल.
कन्या रास:- ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहेत त्यांची आज प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या.
तुळ रास:- तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे पण कामाच्या व्यापामुळे आज तुम्ही त्रासून जाल, आर्थिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक रास:- आज आपणास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका.
धनु रास:- जे लोक दुग्धजन्य पदार्थांशी निगडीत व्यवसाय करतात त्यांना आज आर्थिक लाभ संभवतो.
मकर रास:- कुटुंबातील सदस्य बरोबर वाद होण्याची शक्यता, आपली मन:शांती ढळू देऊ नका.
कुंभ रास:- आज भागीदारीत व्यवसाय करताना खूप सावधानता बाळगा धोका संभवतो.
मीन रास:- घरातील प्रश्न सोडवताना आज तुमच्या बुद्धीचा कस लागेल.











Leave a Reply