डोंबिवली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा आणि उत्सवापुरते मर्यादित न राहता डोंबिवलीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. भाजपा जिल्हा सचिव प्रकाश तेलगोटे आणि समाजसेविका सविता तेलगोटे यांच्या माध्यमातून गरजू, दिव्यांग, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला.
नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या सहकार्याने आणि प्रकाश तेलगोटे यांच्या पुढाकारातून 25 दिव्यांग बांधवांना अत्याधुनिक व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यासोबतच शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्ण तसेच अनाथाश्रमातील गरजूंना फळवाटप करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले, तर गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा यासाठी मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
“वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.”
प्रकाश तेलगोटे यांनी सांगितले.













Leave a Reply